कराडमध्ये काँग्रेसला खिंडार; दिग्गजांचा भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार आनंदराव पाटील यांचे पुत्र व काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस प्रतापसिंह पाटील, कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक सुनील पाटील, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आर. टी. स्वामी, संतकृपा उद्योग समूहाचे संस्थापक अशोक भावके यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मुंबईमध्ये महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. माजी खासदार किरीट सोमय्या, सुरजितसिंह ठाकूर, प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी, डॉ. अतुलबाबा भोसले यावेळी उपस्थिती होते. दिग्गज नेते भाजपमध्ये दाखल झाल्याने कराडमध्ये काँग्रेसला खिंडार पडले आहे.

विंगचे माजी सरपंच वसंत शिंदे, विजयनगरचे सरपंच सचिन मोहिते, उपसरपंच विश्वास पाटील, राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य सविनय कांबळे, विलासराव पाटील-उंडाळकर गटाच्या उंडाळेच्या उपसरपंच अनुसया शेवाळे, गोवरेचे माजी उपसरपंच निसार मुल्ला, माजी नगरसेवक हरिभाऊ जोशी, आरपीआय अध्यक्ष आप्पासो गायकवाड, गोवरे सोसायटीचे चेअरमन सतीश पवार, गोवरे ग्रा.पं. सदस्य गणेश जाधव, मुंढेचे उपसरपंच भीमराव जमाले, गोवरे ग्रा.प सदस्य रशीद मुल्ला, पवारवाडीचे सरपंच लक्ष्मण धोत्रे, नितीन पाटील, विकास कुंभार, अभिजित पवार, रमेश जगताप, अवधूत डुबल, सागर डुबल, अर्जून हुबाले, आशिष माने, अमोल चव्हाण, प्रशांत चव्हाण, सचिन पवार, दिलीप पवार, डॉ. प्रकाश पाटील, चंद्रकांत शेवाळे, सुनिल जाधव, कुलदीप निकम, मारुती शेवाळे, उत्तमराव साळुंखे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यानी भाजपात प्रवेश केला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्यांच्या जीवावर आत्तापर्यंत राजकारण केले, असे सर्वजण भाजपात आले आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभारावर नाराज होऊन आणि भाजपच्या विकासकार्याने प्रभावित होऊन ते आले आहेत. पक्षात त्यांचा योग्य सन्मान केला जाईल, त्यांना योग्य त्या जबाबदाऱ्या दिल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. सुनील पाटील म्हणाले, गेली 40 वर्षे आमच्या कुटुंबाने काँग्रेसची निष्ठेने सेवा केली. पण गेल्या अनेक महिन्यांपासून आम्हाला जाणीवपूर्वक डावलले जाऊ लागले. या प्रवृत्तीला कंटाळून आम्ही आमच्या शेकडो कार्यकर्त्यासह देशातील मुख्य प्रवाह असणाऱ्या भाजपमध्ये सहभागी झालो आहोत. आर. टी. स्वामी म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांना आमदार करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण आम्हाला हीन भावना मिळू लागल्याने आम्ही भाजपात सहभागी होण्याची निर्णय घेतला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, म्हाडाचे संचालक मोहन जाधव, संजय शेटे, पंकज पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या