कराडमध्ये दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या 30 जणांवर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

नशेत वाहन चालविणाऱ्या तब्बल 30 जणांवर कराड शहर वाहतूक शाखेने गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्यावर “ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह’अंतर्गत दोषारोपपत्र थेट न्यायालयात दाखल केले जाणार आहे. कराड शहरातील वेगवेगळ्या चौकात कारवाई केली जात आहे. अवजड वाहतुकीसह हेल्मेट नसणाऱ्यांवर केलेल्या कारवाई केलेल्यांची संख्या 150 आहे. यांच्याकडून 50 हजारांचा दंडही वसूल केला आहे.

नशेबाज वाहनचालक पोलिसांच्या रडारवर होते. यासाठी वाहतूक पोलिसांनी वेगवेगळ्या चौकासह रस्त्यावर थेट नाकाबंदी केली. दत्त चौक, कोल्हापूर नाका, कृष्णा नाका, कार्वे नाका, पाटण तिकाटणे फाटा, महामार्गावरील मलाकापूर फाटा, खोडशी फाट्यावर पोलिस बंदोबस्तासाठी तैनात होते. नशेबाज तीसहून अधिक युवकांसह नागरिकांवर कारवाई केली आहे. दारू पिऊन वाहन चालविण्याचा खटला भरण्यात आला आहे. यानुसार त्यांच्यावर ड्रंक ऍण्ड ड्राइव्ह अंतर्गत दोषारोपपत्र ठेवण्यात आले आहे.

अवजड वाहने व हेल्मेट न वापरलेल्या 150 लोकांवर कारवाई झाली. त्यांच्याकडून 50 हजारांचाही दंडही वसूल करण्यात आला आहे. यातील अल्पवयीन वाहनचालकांच्या पालकांवर गुन्हे दाखल होणार आहेत. वाहतूक शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक सरोजिनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक शाखेच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.