दारुड्या फेरीवाल्यांचा कर्जत रेल्वे स्थानकात पोलिसावर हल्ला

प्रातिनिधिक फोटो

कर्जत रेल्वे स्थानकात डय़ुटीवर असणाऱया पोलीस हवालदारावर मुजोर फेरीवाल्यांनी हल्ला करून त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेत ते जबर जखमी झाले. याप्रकरणी या फेरीवाल्यांवर कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कर्जत रेल्वे स्टेशनच्या पूर्व भागातील काही फेरीवाले दारू पिण्यासाठी बसले असताना तिथून कर्जत रेल्वे पोलीस स्टेशन येथे गोपनीय शाखेत कार्यरत असलेले पोलीस राजेंद्र बागुल हे जात होते. इथे रेल्वे हद्दीत दारू का पिता, अशी विचारणा केली असता या दारुडय़ा फेरीवाल्यांनी राजेंद्र यांना शिवीगाळ करून मारहाण केली. यात राजेंद्र यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रेल्वे पोलिस निरीक्षक संभाजी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.