बीड जिल्ह्यातील दोन गावात 3500 शेतकऱ्यांना कर्जमाफी

2482

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा जोतिबा फुले कर्जमाफीची घोषणा केली होती. सोमवारी कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली. नित्रुड आणि तेलगाव या दोन गावातील 3,450 शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. यात नित्रुड गावातील पहिला लाभार्थी राठोड राजाभाऊ गणपतराव हा ठरला. कर्जमाफीची पहिली यादी सोमवारी जाहीर झाली. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील नित्रुड आणि तेलगाव या दोन गावातील 3,450 शेतकरी यादीत लाभार्थी ठरले आहेत. जिल्ह्यातील दोन गावात आधार प्रमाणीकरण प्रक्रिया सुरू करणयात आली आहे. यावेळी आपले सरकार सेवा केंद्रास तेलगाव येथे भेट देऊन लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरण पावती देताना जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, शिवाजी बडे, सहाययक निबंधक कार्यालयाचे सहकार अधिकारी शिवराज नेहरकर, सेवा संस्थेचे चेअरमन, सचिव संबंधित केंद्र चालक व लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या