कार्ला ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेनेचे हुलावळे बिनविरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कार्ला

कार्ला ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेनेचे संजय हुलावळे यांची बिनविरोध निवड झाली. नंदा हुलावळे यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने, सरपंच अश्विनी हुलावळे यांचा अध्यक्षतेखाली रविवारी उपसरपंच निवडीसाठी सभा बोलविण्यात आली होती. निर्धारित वेळेपर्यंत संजय हुलावळे यांचा एकच अर्ज आला होता. नंतर निवडणुक सहाय्यक अधिकारी ग्रामसेवक श्रीधर नाईकडे यांनी सभेचा वृत्तांत वाचून दाखविला. निर्धारित वेळेपर्यंत एकच अर्ज आल्याने संजय हुलावळे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

या निवडीवेळी सरपंच अश्विनी हुलावळे, नंदा हुलावळे, प्रदीप हुलावळे, चंद्रकांत गायकवाड, रूपाली हुलावळे हे सहा सदस्य उपस्थित होते. माजी उपसभापती शरदराव हुलावळे, युवासेना मावळ विधानसभा चिटणीस विशाल हुलावळे, शाखाप्रमुख विनोद हुलावळे, उपशाखाप्रमुख विशाल वसंत हुलावळे, उपशाखाप्रमुख सतीश मोरे, सागर हुलावळे, सनी हुलावळे, योगेश हुलावळे, रघुनाथ सावंत, कुमार हुलावळे यांच्या हस्ते उपसरपंचाचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.