जमीन घोटाळा – भुमरे यांच्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहराच्या हृदयस्थानी असलेल्या कार्ल्डा कॉर्नर परिसरातील जागेचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला असून, शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांचा वाहनचालक तसेच जमिनीचे मूळ मालक सालारजंगाच्या विरुद्ध परभणी येथील वकील ऍड. मुजाहिद खान यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या 9 एकर जागेचा हैदराबादेतील न्यायालयात वाद सुरू होता. ही जागा सालारजंगाचे वारस मीर मेहमूद अली यांच्या नावे आहे. सालारजंगाच्या वारसातील वाटणीनुसार जागेचा दोनआणे हिस्सा मेहमूद अलीच्या वाटय़ाला आला आहे. ही संपूर्ण कायदेशीर लढाई लढण्यासाठी मीर मेहमूद अली याने परभणी येथील वकील ऍड. मुजाहिद खान यांची मदत घेतली. खटला लढण्यासाठी माझ्याकडे पैसा नाही. तुम्हीच खर्च करा, असे मेहमूद अलीने ऍड. मुजाहिद खान यांना सांगितले होते. खटल्याचा निकाल माझ्या बाजूने लागल्यास तीन एकर जमीन तुमच्या नावावर करून देतो, असा शब्द मेहमूद अलीने दिला होता. मात्र, जागेचा निकाल आल्यानंतर मेहमूद अलीने जावेद रसुल शेख याच्या नावावर हिबानामा करून दिला.

खटल्याची प्रक्रिया सुरू असताना मेहमूद अलीने काल्डा कॉर्नरवरील जागेसह शहरातील इतर जागांच्या विक्री संदर्भात मालकी हक्क आपल्याला लिहून दिला होता. एका जागेचा हिबानामाही माझ्या नावावर करून दिलेला आहे. असे असताना त्यांनी परत दुसरा हिबानामा करून दिला ही फसवणूक असल्याचे मुजाहिद खान यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मुजाहिद खान यांच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या 316(2), 318(3), 351(2),3 (5) कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.

कोटय़कधींचा व्यवहार

जमिनीची रेडीरेकनर किंमत सुमारे 241 कोटी रुपये असून, बाजारभाक 500 कोटींपर्यंत असल्याचे सांगितले जाते. कोटय़कधी रुपयांच्या या जमिनीचा करारनामा, किक्री व्यवहार क इतरही कागदोपत्री नोंदी झालेल्या असतानाही मीर अली यांनी जाकेद शेख याच्या नाकाकर हिबानामा करून फसकणूक करून किश्वासघात केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पकार करीत आहेत.