
कर्नाटकमधील जनता दल सेक्युलरचे आमदार एसएल भोजेगौडा यांनी भटक्या कुत्र्यांबाबत एक धक्कादायक विधान केलं आहे. ”चिकमंगळुरच्या पालिकेत जेव्हा नगराध्यक्ष होतो तेव्हा आम्ही जेवणात विष कालवून 2800 भटक्या कुत्र्यांना मारले होते. त्यानंतर त्या कुत्र्यांना नारळांच्या बागेत पुरले होते”, असे भोजेगौडा यांनी कर्नाटकच्या विधान परिषदेत सांगितले.
”भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना विशेष करून लहान मुलांना खूप त्रास होतो. आमदार, मंत्र्यांची मुलं कारमधून प्रवास करतात पण सामान्य नागरिकांची मुलं रस्त्यावरून प्रवास करतात. त्यांच्या सुरक्षेचा कधी विचार केला आहे का? रस्त्यावरून चालणारे भटक्या कुत्र्यांचा कसा सामना करत असतील. आम्हालाही प्राण्यांबाबत दया वाटते. पण प्राणी प्रेमी हे विचित्र असतात. जेव्हा तुम्ही या प्राण्यांमुळे एखाद्या लहान मुलाला त्रास होताने बघता. त्याबाबत दररोज वाचता तेव्हा वाईट वाटतं. हल्ली हे सतत बघायला मिळतंय. चिकमंगळुरच्या पालिकेत जेव्हा नगराध्यक्ष होतो तेव्हा आम्ही जेवणात विष कालवून 2800 भटक्या कुत्र्यांना मारले होते. त्यानंतर त्या कुत्र्यांना नारळांच्या बागेत पुरले होते. त्यासाठी आता मला तुरुंगात जरी जावे लागले तरी ठीक’, असे भोजेगौडा म्हणाले.