कर्नाटक चॅम्पियन! विजय हजारे ट्रॉफी चौथ्यांदा जिंकली स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिमन्यू मिथुनने हॅटट्रिकसह टिपलेले 5 बळी आणि मयांक अग्रवाल (69) व के. एल. राहुल (52) यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर कर्नाटकने येथे झालेल्या अंतिम फेरीच्या लढतीत तामीळनाडूवर वीजेडी नियमाच्या आधारे 60 धावांनी विजय मिळवला आणि चौथ्यांदा विजय हजारे ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. तामीळनाडूने सर्वाधिक पाच वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. अभिमन्यू मिथुनने 25 ऑक्टोबर या आपल्या जन्मदिवशी हॅटट्रिक घेत तामीळनाडूचा निम्मा संघ 34 धावांमध्ये गारद केला आणि कर्नाटकला जेतेपद मिळवून दिले.

तामीळनाडूने प्रथम फलंदाजी करताना 252 धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱया कर्नाटकने 1 बाद 146 धावा तडकावल्या असताना पावसाचा व्यत्यय आला. त्यानंतर खेळ होऊ शकला नाही. ज्या वेळी खेळ थांबला तेव्हा कर्नाटकला विजयासाठी 87 धावांची आवश्यकता होती. मात्र याचप्रसंगी कर्नाटकने 1 बाद 146 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्यांना 60 धावांनी विजयी घोषित करण्यात आले.