हे सर्वेक्षण सात कोटी जनतेचे होणार आहे मागासवर्गींयांचे नाही, सुधा मूर्ती यांच्या विधानावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे स्पष्टीकरण

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी सांगितले की इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती आणि लेखिका सुधा मूर्ती यांना राज्यात सुरू असलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणाबद्दल काही गैरसमज झाला आहे. सिद्धरामय्या यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले, की अशी धारणा आहे की हा मागास जातींसाठी सर्वेक्षण आहे. हे मागास जातींचे सर्वेक्षण नाही, त्यांना जे लिहायचे आहे ते लिहू द्या. लोकांनी हे समजून घ्यायला हवे की हे सर्वेक्षण नेमके कशाबद्दल आहे. जर त्यांना समजत नसेल, तर मी काय करू?

मूर्ती दांपत्याने सर्वेक्षणात भाग घेण्यास नकार दिला होता. त्यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हे विधान केले आहे. त्यांनी फॉर्ममध्ये लिहिले होते की ते मागास समुदायांतील नाहीत. सिद्धरामय्या म्हणाले, “इन्फोसिसचा संस्थापक म्हणजे ‘बृहस्पति’ (ज्ञानी) असा अर्थ आहे का? आम्ही वीस वेळा सांगितले आहे की हे मागास वर्गांचे सर्वेक्षण नाही, तर सर्वांसाठीचे सर्वेक्षण आहे.”

ते पुढे म्हणाले, “मी हे अगदी स्पष्टपणे सांगत आहे की हे मागास वर्गांचे सर्वेक्षण नाही, तर कर्नाटकातील सात कोटी लोकांचे सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण आहे असेही सिद्धरामय्या म्हणाले.