
कर्नाटकातील वऱ्हाडी मंडळीनी खच्चून भरलेली खासगी बसला केरळातील कासारगोड जिह्यात रविवारी भीषण अपघात झाला. वऱहाडाची बस चालकाचे नियंत्रण सुटल्युळे रस्त्यावरून घसरून पानाथूर गावातील एका घरावर कोसळली. या अपघातात 5 वर्षाखालील तीन मुलांसह 7 जण ठार झाल्याचे पोलीसांनी सांगितले.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बसमधील प्रवासी कर्नाटकमधील होते. ते केरळ कर्नाटक सीमेवरील एका गावात लग्न समारंभासाठी चालले होते. पानाथूर – सुळ्ळीया मार्गावरील जंगलातील वळणाच्या रस्त्यावरू जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावरून घसरून 20 फूट खोलीवर असलेल्या एका घरावर कोसळली. काही जखमींना पोलीसांनी कन्हानगड सरकारी रुग्णालयात दाखल केले, तर 8 गंभीर जखमींना केरळातील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, पर्रियारम येथे दाखल केले असल्याचे कासारगोड जिल्हा पोलिसांनी सांगितले. सुदैवाने बस कोसळलेल्या घरात कोणाही राहात नसल्याने मृतांची संख्या वाढली नाही.
























































