
सामना प्रतिनिधी। श्रीनगर
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यासाठी मारुती इको गाडीचा वापर करण्यात आला होता त्या गाडीचा मालक सजाद भट्ट असून तो अनंतनाग जिल्हय़ातील रहिवासी आहे, असे एनआयएच्या तपासातून बाहेर आले आहे.
‘सीआरपीएफ’च्या जवानांच्या ताफ्यावरील हल्ल्यासाठी एसयूव्ही किंवा स्यॉर्पिओ गाडीचा वापर केला गेल्याची चर्चा होती, पण फॉरेन्सिक आणि ऑटोमोबाईल तज्ञांच्या मदतीने एनआयएने केलेल्या तपासातून दहशतवाद्यांने मारुती इको गाडीचा वापर केल्याचे सपष्ट झाले.
गाजीच्या संपर्कात होतो!
उत्तर प्रदेशातील देवबंद येथून अटक करण्यात आलेल्या शहनवाझ तेली आणि आकिब मलिक या दोन कश्मिरी तरुणांनी महत्त्वाचा कबुलीजबाब दिला आहे. आम्ही पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल गाजी याच्या संपर्कात होतो, अशी कबुली त्यांनी दिली आहे.
चौकशीची मागणी फेटाळली
पुलवामा हल्ल्यामागील कटाचा तपास करावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. ही याचिका वकील विनीत धांडा यांनी दाखल केली होती. या दहशतवादी हल्ल्यासाठी 370 किलो आरडीएक्सचा वापर करण्यात आला. यामुळे या हल्ल्यामागील कटाची चौकशी होणे आवश्यक आहे, असे धांडा यांनी म्हटले आहे.

























































