कश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी

उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. त्यातच आता कश्मीरमध्ये 40 दिवसांच्या ‘चिल्लई कलान’ला आजपासून सुरुवात झाली. चिल्लई कलानच्या पहिल्याच दिवशी सोनमर्ग, गुलमर्ग इत्यादी भागात जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. अनेक ठिकाणी दोन ते तीन इंच जाड बर्फाची चादर पसरली आहे. कश्मीरमध्ये या दिवसात जोरदार बर्फवृष्टी होते. तो आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक तेथे जातात. गुलमर्गमध्ये झालेल्या बर्फवृष्टीचा पर्यटकांनी मनमुराद आनंद लुटला. बर्फवृष्टीनंतर उत्तरेकडे; थंडीची लाट येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.