#KBC11 क्रिकेटवरील ‘या’ प्रश्नामुळे स्पर्धक 7 कोटींना मुकला, वाचा काय आहे उत्तर

2064

सोनी वाहिनीवर प्रसिद्ध होणारा ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून टीआरपीच्या रेसमध्ये कायम आहे. महानायक अमिताभ बच्चन हा शो होस्ट करत असून यात स्पर्धकांना कोट्यधीश होण्याची संधी मिळते. केबीसीचा यंदा अकरावा सिझन असून यात आतापर्यंत चौघांचे कोट्यधीश होण्याची संधी मिळाली आहे. नुकतेच मूळचे बिहारचे असणारे अजीत कुमार यांनी केबीसीमध्ये एक कोटी रुपये जिंकले.

रेल्वेमध्ये गेल्या 15 वर्षापासून कार्यरत असणाऱ्या अजीत कुमार हे यांनी अतिशय चांगली आणि योग्य उत्तरे दिली. एक कोटी रुपये जिंकलेल्या अजीत यांना 7 कोटी रुपये जिंकण्याचीही सुवर्णसंधी होती. परंतु क्रिकेटवर आधारित प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नसल्याने त्यांनी खेळ सोडला आणि एक कोटी रुपयांवर समाधान मांडले. सात कोटींचा प्रश्न सोडल्याने अजीत यांच्यासह क्रीडाप्रेमींनाही हळहळ वाटली.

kbc2

हॉटसीटवर बसलेल्या अजीत यांनी सात कोटी रुपयांसाठी जो प्रश्न विचारण्यात आला होता तो क्रीकेटशी संबंधीत होता. काच दिवशी दोन वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघाबरोबर दोन टी-20 अर्धशतक ठोकणारा पहिला फलंदाज कोण? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला वरोझ मंगल, मोहम्मद हफीज, मोहम्मद शेहजाद आणि शाकिब-अल-हसन असे चार पर्याय देण्यात आले. मात्र याचे उत्तर माहिती नसल्याने त्यांनी खेळ सोडला.

प्रश्नाचे योग्य उत्तर
अजीत यांना विचारलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर मोहम्मद शहजाद असे आहे. अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहजाद याने एकाच दिवसात दोन अर्धशतके केली. ओमान आणि आयर्लंड अशा दोन संघांविरूद्ध त्याने अर्धशतकी खेळी केली. आधी त्याने ओमानविरूद्ध 80 धावा केल्या. त्यानंतर त्याच दिवशी त्याने आयर्लंडविरूद्ध नाबाद 52 धावा केल्या.

kbc1

आपली प्रतिक्रिया द्या