केईएममध्ये ‘पोस्ट कोरोना ओपीडी’, नायर, सायनमध्येही आठवडाभरात सुरू होणार

मुंबईत सध्या लाखापेक्षा जास्त व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, कोरोनामुक्त झाल्यानंतरही काही जणांना धाप लागणे, श्वास घेताना येणारा अवघडलेपणा, फुफ्फुसांच्या इतर समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर, केईएममध्ये आता पोस्ट कोरोना ओपीडी सुरू करण्यात आली असून येत्या आठवडयात नायर आणि सायन रुग्णालयातही सुरू केली जाणार आहे. यात कोरोनामुक्तीनंतर रुग्णांना येत असलेल्या समस्यांची माहिती घेऊन उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती पालिका रुग्णालयांचे संचालक आणि नायरचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या