Keral Assembly Election – डोनाल्ड ट्रम्प, व्लादमिर पुतीन, जिनपिंग केरळमध्ये करतायत प्रचार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळमध्ये विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी अवघे दहा दिवस उरले आहेत. केरळमध्ये 9 एप्रिल रोजी विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी प्रचारात जोर लावला आहे. डावे पक्ष आपली सत्ता राखून ठेवण्यासाठी तर भाजप सत्तेत येण्यासाठी सर्वोत्तपरी प्रचार करत आहे. त्यातच आता केरळच्या विधानसभा निवडणूकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादमिर पुतीन यांनी एन्ट्री घेतली आहे.

सध्या केरळमध्ये एक AI व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत जगभरातील मोठे नेते हे प्रचार करताना दिसत आहेत. यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादमिर पुतीन, उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, फ्रांसचे पंतप्रधान इमॅन्यूएल मॅक्रॉन, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की हे केरळमध्ये प्रचार करताना दिसत आहेत. यातील सर्वात मजेशीर बाब म्हणजे या सर्व नेत्यांनी केरळचा पारंपारिक पेहराव मांडू व शर्ट घातले आहेत.

सध्या हा व्हिडीओ केरळमध्ये खूपच व्हायरल झाला असून त्यात केरळच्या संस्कृतीचे प्रदर्शन दाखवले असल्याचे सांगत नेटकऱ्यांनी तो व्हिडीओ बनवणाऱ्यांचे कौतुक केले आहे.