
केरळमधील कोट्टाय्यम जिल्ह्यातील एराट्टुपेट्टा गावात एका पती पत्नीचा मृतदेह त्यांच्या भाड्याचा घरात सापडल्याने खळबळ उडाली आहे. रश्मी (35) व विष्णू (36) अशी त्या दोघांची नावं असून ते गेल्या सहा महिन्यांपासून या भागात राहत होते. या दोघांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. मात्र पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहे.
विष्णूची आई ही दोन दिवसांपासून त्यांना फोन करत होती. मात्र विष्णू व रश्मी दोघेही फोन उचलत नव्हते. रश्मी ज्या हॉस्पिटलमध्ये नर्स होती तिथेही फोन केला तर ती कामाला आली नसल्याचे समजले. त्यामुळे विष्णूची आई त्यांना भेटायला आली. मात्र दरवाजा ठोठावून पण कुणीच न उघडल्याने त्यांनी शेजाऱ्यांकडे मदत मागितली. शेजाऱ्यांनी दरवाजा तोडला तर आतलं दृश्य पाहून लोकांना धक्काच बसला. रश्मी व विष्णू हे जमिनीवर मृतावस्थेत पडलेले होते. त्यांचे हात एकमेकांना बांधलेले होते.

























































