
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन व उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन हे चक्क केरळम विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. केरळमच्या पारंपरिक वेशात हे नेते प्रचार करत असल्याचा भन्नाट एआय व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये हे तिन्ही नेते तीन वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी म्हणून दाखवण्यात आले आहेत. ट्रम्प हे भगव्या रंगाचा स्कार्फ घालून भाषण ठोकत असून पुतिन लाल गमछासह प्रचार करत आहेत. जोंग हे घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधताना दिसत आहेत. शी जिनपिंग, नेतान्याहू, इमॅन्युएल मॅक्रॉन व झेलेंस्की हेही प्रचारात सहभागी झाल्याचे व्हिडीओत दिसत आहे.





























































