आशेचा किरण- मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर घटला, केरळमध्ये आढळला फक्त एक रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचे संकट कमी होताना दिसत आहेत. आधी देशातील 25 जिल्हे कोरोनामुक्त झाले होते. आता मुंबईत कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी होत आहे. तसेच केरळमध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचा फक्त 1 रुग्ण आढळला आहे. कोरोनाच्या या संकटात हा आशेचा किरण दिसत आहे. दिल्लीतही गेल्या 24 तासात फक्त 17 रुग्ण आढळले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूंमध्ये 34 टक्क्यांनी घट झाली आहे. बुधवारी महाराष्ट्रात 232 रुग्ण आढळले होते. गेल्या 6 दिवसांतील हे सर्वाधिक कमी रुग्णसंख्या आहे. मुंबईत बुधवारी 140 रुग्ण आढळले होते तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता. मुंबईतही कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूंमध्ये 35 टक्क्यांनी कमी झाली आहे.

तर दुसरीकडे केरळमध्ये आज एकच रुग्ण आढळला आहे. सुरूवातीला केरळमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. केरळमध्ये आतापर्यंत फक्त 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  तर दिल्लीतही गेल्या 24 तासात फक्त 17 रुग्ण आढळला आहे. दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या बुधवारपासून कमी होत आहे. दिल्लीत गेल्या 24 तासात 2 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 32 वर गेला आहे.

देशातही घटले प्रमाण 

देशात बुधवारी कोरोनाचे 866 रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी जेवढे रुग्ण आढळले होते त्याच्या तुलनेत देशात कोरोनाचे प्रमाण 25 टक्क्यांनी घटले आहे.