केसरपूर येथे शेतीच्या वादातून दोन गटात खूनी हल्ला, एकाचा जागीच मृत्यू तर 5 ते 6 गंभीर

धारणीपासून अंदाजे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या केसरपूर गावात शेतीच्या जुना वादातून आज दोन गटात मोठी हाणामारी झाली. यात एका व्यक्तीचा जागेवरच मृत्यू तर 5 ते 6 लोक गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. सर्व जखमींना व मृतकाला धारणी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून जखमींवर प्राथमिक उपचार करून अमरावती येथे हलवण्याची प्रक्रिया सुरू होती.

धारणी पासुन 40 किमी अंतरावर असलेल्या केसरपूर गावातील शामलाल सावलकर व याच्या सहकारी रामलाल सावलकर मोजीलाल सावळकर यांच्या सह 15 ते 20 लोकांनी भाला व कुऱ्हाडीने हल्ला केला असल्याची प्राथमिक माहीती समोर येत आहे. या हल्यात जाफुलाल बाबुलाल चिमोटे याचा जागीच मृत्यू झाला. तर रूपलाल संतोष, शिवचरण, मंगल, व सुमन चीमोटे गंभीर जखमी झाले असून त्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या