केशवराव भोसले नाट्यगृहाचा पडदा पुढील वर्षी उघडणार

संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले आणि त्यांच्याच नावाने असलेल्या नाटय़गृहाचे पुनर्बांधकाम एका वर्षात केशवराव भोसले यांच्या जयंतीदिवशी खुले होणार होते. पण एकमेकांकडे बोट दाखविण्याच्या प्रवृत्तीमुळे दिरंगाईचा फटका बसला आहे. अखेर संबंधित बांधकाम ठेकेदार आणि महापालिका प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत आता पुढील वर्षी नाटय़कर्मीदिनी 27 मार्च रोजी या नाटय़गृहाचा पडदा उघडण्याचे आश्वासन नाटय़कर्मींना देण्यात आले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कलाकारांसाठी पॅलेस थिएटर साकारले. याचेच पुढे संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृह नामांतर झाले. पण गेल्या वर्षी 8 ऑगस्ट रोजी रात्री संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच हे नाटय़गृह आगीत खाक झाले.