
सापडलेल्या रूमच्या चावीचा फायदा उठवत चोरट्याने घरातील मोबाईल लांबविल्या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 15 फेब्रुवारी रोजी खेडमधील आवाशी फाटा येथील गोळे चाळ येथे घडली.
या प्रकरणी आकाश कोदाई यादव (22) मूळ गाव कल्याण बदलापूर सध्या राहणार आवाशी गोळे चाळ यांनी तक्रार दाखल केली आहे. गोळे चाळीत यादव ज्या रूममध्ये भाड्याने राहत आहेत त्या रूमची चावी हरवली होती . ती चावी ज्या अज्ञात व्यक्तीला सापडली त्या अज्ञात व्यक्तीने त्या चावीने रूमचा दरवाजा उघडून रूममध्ये प्रवेश केला आणि रूम मधून 20 हजार 500 रुपये किंमतीचे मोबाईल चोरून नेले या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत



























































