चिमुरड्याला शोषखड्ड्यात पडण्यापासून वाचवले, तहसीलदारांच्या साडेतीन वर्षांच्या मुली समयसुचकता

412

देवरुख तहसीलदारांची साडेतीन वर्षाची मुलगी सुज्ञा ऊर्फ रमा हिने खेळता खेळता शोषखड्डय़ात पडणार्‍या श्रीकर जोशी या अडीच वर्षाच्या मुलाला समसुचकता व प्रसंगावधान राखुन एका हाताने धरुन ठेवले व पुढील अनर्थ टळला. सुज्ञा व श्रीकर हे केशवसृष्टीतील लिमये यांच्या घराजवळ खेळत होते. खेळता खेळता ही दोघेही घराच्या मागील बाजूस गेली. तिथे तीन फूट खोली असलेला शोष खड्डा आहे. हा खड्डा सिमेंट पत्रा टाकून झाकण्यात आला होता. खेळताना सुज्ञा आणि श्रीकर हे पञ्याजवळ गेले. श्रीकर हा पत्र्यावर उभा राहिल्याने त्याच्या वजनामुळे पत्रा तुटला आणि श्रीकर खड्ड्यात पडण्याच्या बेतात होता. सुज्ञाने प्रसंगावधान राखून एका हाताने त्याचा हात पकडून ठेवला आणि दुसऱ्या हाताने पत्रा पकडून ठेवला. पत्रा मोडल्याचा मोठा आवाज झाल्याने म्हणुन श्रीकरची आई धावत आली. तिने केलेला आरडाओरडा ऐकुन सगळेच जमा झाले आणि त्यांनी श्रीकरला बाहेर काढले.

आपली प्रतिक्रिया द्या