किल्लारी येथे शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। किल्लारी

औसा तालुक्यातील किल्लारी येथील 55 वर्षीय शेतकरी दिलीप फुलचंदराव भोसले यांनी नापिकीला कंटाळून शनिवारी 23 फेब्रुवारी रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. वाढत्या कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी एक चिट्टीत लिहून ठेवले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे