विशेष – महिला दिन, 1975 ते 2025 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> किरण येले

जगभरात अगदी उत्साहाने महिला दिन साजरा होतो. लिंगभेदाच्या पलीकडे आपला समाज गेला आहे याचे हे द्योतक मानावे का? असा प्रश्न पडावा इतका उत्साह. मात्र या उत्साहात महिलांच्या खऱ्या प्रश्नांना, त्यांच्या समस्यांना आणि त्या ओघाने त्यांच्या जाणिवांना बगल दिली जात आहे हे प्रकर्षाने जाणवते. उथळ सादरीकरणाच्या भरावाखाली तिच्या मूलभूत संवेदना गाडल्या जात आहेत. याला अधोरेखीत करणारे वास्तवदर्शी चित्र बरंच काही सांगून जाते. महिला दिनानिमित्त या जाणिवा, या संवेदना एक माणूस म्हणून प्रत्येकाने जाणाव्यात हाच या दिवसाचा मुख्य उद्देश असावा.

सन 1882 साली ताराबाई शिंदे या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत शिकलेल्या स्त्राrने पहिल्या वेळेस एक पुस्तक लिहिल़े  त्याचे नाव स्त्राr-पुरुष तुलना अथवा स्त्राr आणि पुरुष यात अधिक साहसी कोण हे दाखवण्याकरिता लिहिलेला निबंध असे आहे. या ग्रंथाची किमत त्या वेळेस नऊ आणे होती. या पुस्तकाने त्या काळात बरीच खळबळ उडवून दिली होती. कारण त्या काळातील स्त्राr आणि पुरुष याच्या सामाजिक वागण्यातील दुटप्पीपण त्या पुस्तकात ताराबाई शिंदे यांनी चिमटे काढत, विनोद करत अधोरेखित केले होते. आजही ते पुस्तक वाचताना हसू येते आणि विचार येतो की, आज जर ताराबाई शिंदे असत्या तर त्यांनी आज जागोजागी साजरा होणारा महिला दिन यावर काय आणि कसे लिहिले असते. आपण सारे आज दिनमय किंवा सप्ताहमय झालो आहोत. आपल्याला त्याची इतकी सवयही झाली आहे. वर्षात एक दिवस आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो आणि त्या दिवशी सगळीकडे देशभक्तीची गाणी लावतो. वर्षात एक दिवस आपण गांधी जयंती साजरी करतो आणि त्या दिवशी गांधीजींना वंदन करतो. वर्षात एक दिवस आपण शिवजयंती साजरी करतो आणि जय शिवाजी म्हणतो. असे बरेच काही सांगता येईल. पण जो दिवस साजरा करतो त्यानंतर वर्षभर आपण देशाचा अभिमान बाळगून सार्वजनिक वागणे बदलतो का? तर नाही आज जागोजागी कचरा दिसतो, कुठे कुठे सार्वजनिक ठिकाणी थुंकलेले दिसते. देश अस्वच्छ आपण करतो ही देशभक्ती नाही हे आपल्याला कळत नाही. जे स्वातंत्र्य दिनानंतर होते तेच इतर सगळय़ा दिवसांचे होते. म्हणजे हे सगळे दिन आपण का साजरे करतो याचा अर्थच आपण विसरलो की काय, असा विचार आजची सामाजिक स्थिती पाहिली की मनात येतो.

उदाहरणच द्यायचे झाले तर 8 मार्च रोजी साजरा होणारा महिला दिनाचे उदाहरण घेता येईल. उद्या महिला दिनानिमित्त आपल्या आसपास अनेक कार्पामांचे आयोजन होईल. त्यात किती कार्पामात वैचारिक मंथन असेल? स्त्राrचा झालेला प्रवास आणि पुढे अपेक्षित असलेला प्रवास यावर चर्चा असेल? किंवा स्त्रियांची आजच्या काळातील स्थितीगती यावर ऊहापोह असेल? पुरुष आणि समाज यांच्याकडून अपेक्षित सहकार्य यावर मंथन असेल? आपण सगळय़ाच दिवसांचे उत्सव करत चाललो आहोत. वाढदिवस म्हणजे आपली विचाराने वाढ होण्याचा दिवस, पण नेमके त्या दिवशी आपण विचाराने किती वाढलो आहोत याचा विचारच करत नाही, तसे या सगळय़ा दिवसांचे झाले आहे. ज्याचा विचार करण्याचा आणि पुढे वर्षभर कृती करण्यासाठी, मंथन करण्यासाठी दिवस पाळला जातो तो उद्देशच हरवल्यासारखा वाटतो आणि म्हणूनच मग आसपास स्त्रियांवर अत्याचार होतानाच्या बातम्या कानी येतात. प्रेमात नकार दिला म्हणून जीवे मारण्याच्या बातम्या ऐकू येतात. सहजीवनात पुरुषाचे ऐकले नाही म्हणून खून केल्याच्या बातम्या ऐकू येतात. बापाने प्रेमविवाहास विरोध करूनही लग्न केले म्हणून बापाने मुलीला मारल्याच्या बातम्या ऐकू येतात. एका बाजूला महिला दिन साजरा करताना दुसऱ्या बाजूला अशा घटना होत आहेत हे वास्तव आपण लक्षात घेतले पाहिजे आणि त्या घटना का घडत आहेत यावर या दिवशी विचार केला पाहिजे. स्त्राrला नकार देण्याचा अधिकार आहे हे पुरुषाच्या आणि समाजाच्या मनावर बिंबवले पाहिजे. मुलीला तिचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे हे समाजाच्या मनावर बिंबवले पाहिजे. मुलीला मुलासारखेच वागवले गेले पाहिजे हे समाजाच्या मनावर बिंबवले गेले पाहिजे आणि त्यासाठी हा दिवस आहे. वर्षभराच्या आखणीसाठी हा दिवस आहे.

आपल्यापैकी अनेकांना माहीत नाही की, या महिला दिनाची सुरुवात नेमकी कुठे आणि कशी झाली. सन 1908 साली 28 फेब्रुवारी या दिवशी अमेरिकेत पहिल्यांदा महिला दिन साजरा केला

गेला. सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिकाने 1908 महिलांच्या सन्मानार्थ या दिवसाचे आयोजन केले होते. या 1908 महिला गारमेंट

फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या होत्या आणि त्यांनी कारखान्यातील अव्यवस्थेविरोधात बंड उभारले होते. पुढे सन 1975 साली आंतरराष्ट्रीय महिला वर्ष साजरे केले गेले आणि दोन वर्षांनंतर 8 मार्च हा दिवस महिला दिन दरवर्षी साजरा करण्याचे सुतोवाच झाले.

याचा अर्थ लवकरच महिला दिनाला 50 वर्षे पूर्ण होतील. या 50 वर्षांत जगभरच महिला सक्षमीकरणाचे सर्वतोपरी उपाय आपण सारे करत आहोत, पण समाजात ते रुजते आहे का? की वरवर आपण रंगरंगोटी करत आहोत याचा विचार होणे गरजेचे आहे असे वाटते.

सामाजिक व्यवस्थेतील स्त्रियांचा विचार आपण काही काळ बाजूस ठेवून कौटुंबिक व्यवस्थेत आज स्त्रियांचे स्थान याचा विचार केल्यास काय चित्र समोर येते याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. ग्रामीण भागातील स्त्रियांना आणि त्यांच्या विचारांना आज त्यांच्या कुटुंबात किती स्थान आहे? शहरातील कमावत्या स्त्रियांनाही आज घरात महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत का? या दोन्ही प्रश्नाचे उत्तर हो असेल तर आपण महिला दिन साजरा करण्याचे प्रयोजन यशस्वी झाले आहे असे म्हणावे लागेल. परंतु या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी असेल तर मात्र महिला दिन साजरा करताना नेमके काय करायला हवे याचा गांभीर्याने विचार करावा लागेल.

[email protected]

 (लेखक साहित्यिक व नाट्यलेखक आहेत.)