स्वच्छता मिशनला पूरक ठरणारे मशीन किर्लोस्कर आय-लँड लाँच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
kirloskar-koel

टिकाऊपमाला अधिक प्राधान्य देण्याच्या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने आपल्या नवीन आणि अमर्याद अशा दूरदृष्टीचा परिचय देत किर्लोस्कर ऑइल इंजिन्स (KOEL) ने किर्लोस्कर आय-लँड सादर केले आहे. हे पूर्णपणे स्वयंचलित सेंद्रीय कचरा कंपोस्ट आहे जे जैविक तंत्रज्ञान आणि प्रगत अभियांत्रिकी यांचा मेळ साधून घरे आणि व्यावसायिक जागेतून येणाऱ्या सेंद्रीय कचऱ्याला खतामध्ये रुपांतरित करते. लँडफिलमध्ये कचरा टाकणे कमी करणे आणि सरकारी संस्थांवर कचरा प्रक्रियेचा दबाव कमी करणे हे किर्लोस्कर आय-लँड बाजारात आणण्या मागचे उद्दीष्ट आहे.

किर्लोस्कर हा देशातील अग्रगण्य शाश्वत अभियांत्रिकी समाधान देणारा उद्योग आहे. स्वच्छ आणि हरित हिंदुस्थान निर्माण करण्याच्या सरकारच्या स्वच्छता अभियानाला पूरक आहे. या मशीनचा आवाज होत नाही. 24 तासांपेक्षा कमी वेळ प्रक्रिया करण्यासाठी लागतो. तसेच यातून दुर्गंधी किंवा कुठल्याही प्रकारचा वास येत नाही. याला फारसा मेंटेनन्स नाही. किर्लोस्कर आय-लँड 25 ते 1250 किलो मशीनमध्ये उपलब्ध आहे.