हे करून पहा – आमरस काळा पडू नये म्हणून…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमरस करताना त्यात थोडे थंड दूध घातल्यास रसाचा रंग काळा पडत नाही. आमरस बनवल्यानंतर तो लगेच हवाबंद डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवावा. हवेचा संपर्क जेवढा कमी, तेवढा रस जास्त काळ ताजा दिसतो.

आमरस साठवण्यासाठी स्टीलऐवजी काचेच्या भांडय़ाचा वापर करा, यामुळे रासायनिक प्रक्रिया मंदावते. आमरस करताना त्यात बर्फाचे खडे टाकल्याने तापमान कमी राहते आणि रसाचा नैसर्गिक पिवळा रंग टिकून राहतो.