भिशीच्या पैशासाठी महिलेची हत्या

461
crime

भिशीच्या पैशाकरिता महिलेची हत्या करणाऱ्याच्या मालवणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. अब्दुल रहमान नाझीर शेख असे त्याचे नाव आहे. त्याच्या दुसऱ्या साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

मालवणीच्या कलेक्टर कंपाऊंड येथे राहणारी कंचन अजय सिंग ही भिशी चालवत असायची. तिच्या घरी खूप पैसे असतात. तिने घर दुरुस्तीसाठी एक लाख रुपये घरात ठेवल्याची टीप अब्दुलला मिळाली होती. झटपट श्रीमंत होण्यासाठी अब्दुलने चोरीचा कट रचला.

कंचन ही रात्री घरी एकटीच असते याची माहिती अब्दुलला होती. 7 ऑक्टोबरच्या रात्री अब्दुल आणि त्याचा साथीदार हे तिच्या घरात शिरले. त्या दोघांनी कपाटातून सोन्याचे दागिने आणि पैसे चोरले. चोरी केल्यानंतर त्या दोघानी कंचनची हत्या करून पळ काढला. दुसऱया दिवशी सकाळी कंचनचा मुलगा घरी आला तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेत पडून होती. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने याची माहिती मालवणी पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी 30 हून अधिक सीसीटीव्हीची पाहणी केली पण नेमका मारेकरी कोण हे स्पष्ट होत नव्हते. अखेर खबऱयाने संशयितांची माहिती पोलिसांना दिल्यावरून पोलिसांनी अब्दुलला ताब्यात घेतले. फरार साथीदाराच्या मदतीने कंचनच्या हत्येची त्याने पोलिसांना कबुली दिली. अब्दुलला अटक करून आज न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या