कोल्हापूर – आज 11 रुग्ण सापडल्याने कोरोनामुक्तीच्या मिशनला ग्रहण

699

कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात आज पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. दिवसभरात नवे ११ कोरोना पाॅझीटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकुण कोरोना बाधीतांची संख्या ७८९ वर पोहोचली. आज बाधीत रुग्णांमध्ये एका आठ वर्षांच्या मुलाचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान काल दिवसभरात जिल्ह्यात प्रथमच शहरात एका ६२ वर्षीय सराफाचा तर चंदगड येथील एका ४६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर मुंबईहुन येथे परतलेल्या आंतरराष्ट्रीय शरिरसौष्ठवपट्टुला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने परिसरात धास्ती पसरली होती.

आज दोन कोरोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत एकुण ७१२ कोरोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने, सध्या ५९ कोरोना बाधीत रुग्णांवर सीपीआर मध्ये कोरोना कक्षात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडुन मिळाली.

आपली प्रतिक्रिया द्या