कोल्हापूरात 195 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर जिल्ह्यात नव्या कोरोना बाधितांच्या तुलनेत आजही कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असुन मृत्युदरही कमी झाल्याने समाधानकारक चित्र दिसून येत आहे. काल बुधवारी सायंकाळी ५ ते आज सायंकाळी 5 पर्यंत गेल्या चोवीस तासांत 195 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण बाधीतांची संख्या 46 हजार 317 वर पोहोचली आहे.

चोवीस तासांत कोरोनामुक्त झालेल्या 929 जणांना घरी सोडण्यात आले आहे.आतापर्यंत एकूण 38 हजार 522 कोरोना मुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.शिवाय गेल्या चोवीस तासांत 11 जणांचा व आतापर्यंत 1 हजार 525 बाधितांचा मृत्यू झाला आहे.‌ सध्या एकूण 6 हजार 330 पॉझीटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडुन मिळाली.

दरम्यान गेल्या चोवीस तासांत कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात-86, इंचलकरंजीसह इतर नगरपालिका क्षेत्रात-22 तर करवीर- 17, हातकणंगले-15, शाहुवाडी-12 आणि शिरोळ तालुक्यात 9 असे नवे कोरोना बाधीत रुग्ण आढळले.