कोल्हापुरात चार हजारांहून अधिक कर्मचारी संपावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महावितरणच्या खासगीकरणाविरोधात राज्यभरात झालेल्या संपात जिह्यातील चार हजारहून अधिक महावितरणचे कर्मचारी, अधिकारी आणि अभियंते सहभागी झाले होते. ताराबाई पार्क येथील महावितरण कार्यालयाबाहेर अधिकारी, कर्मचारी आणि अभियंत्यांनी धरणे आंदोलन करत राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जिह्यासह शहरातील विविध पक्ष, संघटनांनी वीज कर्मचाऱयांच्या या मागणीला पाठिंबा दर्शविला होता.