कोल्हापूरमध्ये एका दिवसात तब्बल आठजण पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई आणि सोलापूर वरून कोल्हापूरात आलेल्या चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे आज सकाळी स्पष्ट झाले. पाठोपाठ दुपारी आणखी चौघेजण पॉझीटिव्ह आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एकाच दिवसात आठ कोरोनाबाधित आढळल्याने आतापर्यंतची संख्या ४४ वर गेली आहे. आतापर्यंत १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून,इंचलकरंजी येथील एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे.

आज सकाळी सोलापुरहुन येथे आलेल्या २३ वर्षीय डॉक्टर तरुणीसह शाहुवाडीतील २२ वर्षाचा तरुण, भुदरगड तालुक्यातील ३२ वर्षाचा तरुण तर आजरा तालुक्यातील ४९ वर्षाच्या पुरुषाचा यामध्ये समावेश आहे. तर सायंकाळी पन्हाळा तालुक्यातील २६ वर्षांचा एक तरुण, गारगोटी(ता.भुदरगड) मधील २७ वर्षांची एक महिला व एक ८ वर्षांचा लहान मुलगा आणि कोल्हापूर मधील २८ वर्षांच्या तरुणाचा समावेश आहे. पालघर मधून पन्हाळा तालुक्यात एकूण ८ जण आले होते.त्यापैकी एकाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई,पुणे,सोलापूर आदी रेडझोन मधुन कोल्हापूरात येणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, गेल्या शनिवारीपासुन कोरोनाची ही येथे संख्या वाढत आहे.काल शनिवारी एकाच दिवशी सात जण कोरोना बाधीत असल्याचे स्पष्ट झाले.यातील पाच जण मुंबई तर दोघेजण सोलापूर जिल्ह्यातुन आले आहेत.तर आज सकाळी नव्याने चौघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.हे सर्वजण दि.१३ आणि १५ मे रोजी सीपीआर मध्ये दाखल असल्याची माहिती मिळाली.आकुर्डी (ता.भुदरगड),कोल्हापूर शहरात ,कनान नगर झोपडपट्टीतील तरुण आणि तामिळनाडूकडे निघालेला पुरुष असे तिघेजण कोरोनामुक्त झाल्याने,काल सायंकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.त्यामुळे समाधानाचे वातावरण असतानाच,आज जिल्ह्यात प्रथमच नव्याने आठ रुग्ण आढळल्याने,कोल्हापूरकरांनी चिंता वाढली आहे.

**मरकजला केलेले ‘ ते ‘ २४ जण परतले

मरकज,दिल्लीत धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेले आणि लाॅकडाऊनमुळे अडकलेले जिल्ह्यातील २४ जण आज रविवारी कोल्हापुरात परतले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून त्या सर्वांना पुलाची शिरोलीत क्वारंटाईन करण्यात आले आहे.या सर्वांचे स्वब घेण्यात आले असुन,खबरदारीसाठी त्यांच्यावर सीपीआरच्या वैद्यकीय पथकाचे विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे.