
कोल्हापूरच्या मराठमोळ्या इंजिनीअर तरुणाने जागतिक स्पर्धेत उंच भरारी घेतली आहे. अॅप्पल कंपनीने आयोजित केलेल्या फोटोग्राफी स्पर्धेत तरुणाने टिपलेल्या अनोख्या फोटोला पहिल्या दहामध्ये स्थान मिळाले आहे. त्याने काढलेल्या फोटोची जगभरात चर्चा होत असून सगळीकडे कौतुक होत आहे. हा कोल्हापूरकर तरुण म्हणजे प्रज्वल चौगुले.
प्रज्वल कोल्हापूरचा असून तो इंजिनीअर आहे. प्रज्वलला निसर्गात रमायला आवडते. प्रज्वला निसर्गाच्या विविध रुपाचे फोटो काढायला आवडतात. तो मॉर्निंग वॉकला जात असताना त्याला कोळ्याच्या जाळ्यावर दवबिंदू पडल्याचे दिसून आले. हे दृश्य त्याला माळेत मोती गुंफल्यासारखे दिसत होते. त्याने लगेच आपल्या आयफोन 13 प्रो मध्ये फोटो टिपला. फोटोचे वैशिष्ट्य म्हणजे हा फोटो निसर्गाचे वेगळे रुप दाखवतो.
Extremely overwhelmed to be a winner of the Apple Shot on iPhone Macro Challenge!
Link to the apple newsroom: https://t.co/9KsLOg56pR
Honoured to represent India 🇮🇳 on a global level #iphonemacrochallenge #ShotoniPhone #Apple #india pic.twitter.com/ML0JWgmcyJ
— Prajwal Chougule (@PrajwalReal) April 14, 2022
अॅप्पल कंपनीने शॉट ऑन आयफोन ही फोटोग्राफी स्पर्धा आयोजित केली होती. 25 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान फोटो मागविण्यात आले होते. या स्पर्धेत प्रज्वलला पहिल्या 10 मध्ये निवड झाली आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम पेजवर फोटो शेअर करत माहिती दिली आहे. चीन, हंगेरी, इटली, स्पेन, थायलंड आणि अमेरिका या देशांतील इतर नऊ विजेत्यांमध्ये प्रज्वल चौगुलेच्या नावाचाही समावेश झाला आहे. प्रज्वलने काढलेला फोटो अॅप्पलच्या अधिकृत संकेतस्थळावर फिचर केला जाणार आहे. याशिवाय अॅप्पलच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवर आणि निवडक शहरांच्या बिलबोर्डवर झळकवणार आहेत.




























































