
कामाची बिले मंजूर करण्यासाठी 15 हजारांची लाच घेणाऱ्या ‘महावितरण’च्या सहायक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. धर्मराज विलास काशिदकर (वय 40) असे या सहायक अभियंत्याचे नाव आहे.
तक्रारदाराच्या कामाची बिले मंजूर करून देण्यासाठी काशिदकर याने प्रत्येक कामासाठी 500 रुपये अशी एक लाखांच्या लाचेची मागणी केली. 23 फेब्रुवारी रोजी ठेकेदाराच्या तक्रारीनंतर झालेल्या पडताळणीत झालेल्या कामांची बिले मंजूर करण्यासाठी 75 हजार नंतर द्या; पण झालेल्या बिलांपोटी 25 हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 15 हजारांची लाच घेऊन येण्यास सांगितले होते. आज काशिदकर याला रंगेहाथ पकडण्यात आले.

























































