कोल्हापूरात माणुसकीची भिंत, ‘नको असेल ते द्या, हवे असेल ते घेऊन जा’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दीपावलीच्या पार्श्वभूमीवर समाजातील गरीब घटकांसाठी ‘नको असेल ते द्या, हवे असेल ते घेऊन जा’ हे ब्रीदवाक्य घेऊन सीपीआर चौकात आज पुन्हा माणुसकीची भिंत उभी राहिली. नको असलेले कपडे देण्यासाठी शेकडो दातृत्वांची रीघ लागली. याच दातृत्वातून हजारो गरजवंतांना ऐन दिवाळीच्या तोंडावर कपडे देऊन ही माणुसकीची भिंत अधिक मजबूत केली.

आजही देशामध्ये लाखो लोकांना अन्न, वस्त्र्ा आणि निवारा या मूलभूत गोष्टींसाठी झगडावे लागते. लाखो बेघर लोकांच्या अंगभर कपडे नसतात. अशा गरजू आणि गरीब लोकांसाठी कोल्हापुरात गेल्या सात वर्षांपासून ही माणुसकीची भिंत उभी आहे. आपल्याकडील जुनी कपडे तेथे द्यायचे आणि ज्या गरजूंना हवी आहेत, तेथून घेऊन जायचे. शनिवारी सकाळी आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत गरजूंना कपडे वाटप करून या उपक्रमाची सुरुवात झाली. मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, सुधर्म वाझे, उद्योजक प्रशांत पोकळे, संदीप नष्टे, प्रा. महादेव नरके, संतोष पाटील, सुखदेव गिरी, सचिन पाटील, प्रसाद पाटील, अमरसिंह पाटील, सूरज पाटील, निनाद कामत, इम्तियाज मोमीन, डॉ. देवेंद्र रासकर, प्रवीण पाटील आदी या उपक्रमासाठी परिश्रम घेत आहेत.