कोल्हापुरात सायंकाळपर्यंत आणखी 19 रुग्णांची भर, जिल्ह्यात एकूण 237 कोरोना पॉझीटिव्ह

580

कोल्हापुरात आज शुक्रवारी सकाळी दहा वाजता 10 अहवाल कोरोना पॉझीटिव्ह आले आहेत. तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत आणखी नऊ जणांची भर पडली. त्यामुळे आजअखेर जिल्ह्यात एकूण कोरोना पॉझीटिव्ह रुग्णांची संख्या 237 झाली आहे. सकाळ पर्यंत सर्वाधिक शाहूवाडीत 78 रुग्ण आढळले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी  दिली.

सकाळी दहाच्या आकडेवारीनुसार तालुका, मनपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या अशी –
आजरा- 11
भुदरगड- 23
चंदगड- 13
गडहिंग्लज – 5
गगनबावडा- 4
हातकणंगले- 1
कागल- 1
करवीर- 12
पन्हाळा- 13
राधानगरी- 36
शाहूवाडी – 78
शिरोळ- 4
नगरपरिषद क्षेत्र- 7
कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 16
असे एकूण 224 आणि पुणे – 1 कर्नाटक – 2 आणि आंध्रप्रदेश- 1 इतर जिल्हा व राज्यातील चौघे असे मिळून एकूण 228 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या झाली होती. सायंकाळी पाचच्या सुमारास यामध्ये आणखी वाढ होऊन ही संख्या एकूण 237 झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या