
कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 14 कोरोना रुग्णांची वाढ झाली असतानाच, आज सोमवारी तब्बल 18 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या पाच दिवसांत जिल्ह्यात एकूण 40 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. हे सर्वजण मुंबई, सोलापूर अशा रेडझोनमधून आले आहेत.
सोमवारी सकाळी आढळून आलेल्या पाच पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सीपीआरमधील एक, राधानगरी तालुक्यातील 2 आणि आजरा तालुक्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या 56 वर पोहोचली होती. दुपारी कोल्हापूर शहरासह शाहुवाडी तालुक्यातील मलसेवाडी येथील एक असे दोन रुग्ण आढळले. सायंकाळी कोल्हापूर शहरातील कावळा नाका परिसरातील 3, जवाहर नगरमधील एकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अन्य 7 जणांची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळालेली नव्हती. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा आतापर्यंत 67 वर गेला आहे.
Live- जवळपास 5 लाख मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवलं आहे- मुख्यमंत्री
रक्षा विसर्जनासाठी मुंबईतुन आले
दरम्यान, यातीळ पाच कोरोना पाॅझीटिव्हपैकी हालेवाडी, ता. आजरा गावातील दोघे आहेत. मुंबईत करोना सदृश आजाराने एकाचा मृत्यु झाल्याने अस्थी विसर्जनासाठी पत्नी, दोन मुले, भाऊ, भावजय आदी आले होते. गावात आल्यावर सर्व कुटुंबीय आणि भावकी एकत्र आले. शोक अनावर होऊन ते एकमेकांच्या गळ्यात पडून रडले. काल दुपारी सगळ्यांना क्वारंटाइन केले होते. आज दोघांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.
































































