कोल्हापूरात एकूण 278 पॉझिटिव्ह शाहूवाडीत सर्वाधिक 89

309

शनिवारी सायंकाळी 5 वाजता 829 प्राप्त अहवालापैकी 17 अहवाल पॉझिटिव्ह आले. तर 811 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एक नाकारण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण 278 पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत 89 रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बी.सी.केम्पी-पाटील यांनी सायंकाळी उशिरा दिली.

शनिवारी दिवसभरात आलेल्या 17 पॉझीटिव्ह अहवालामध्ये, आजरा-2, भुदरगड-8, शाहूवाडी-7 असा समावेश आहे. तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा- 15, भुदरगड- 32, चंदगड- 18, गडहिंग्लज- 13, गगनबावडा- 5, हातकणंगले- 3, कागल- 1, करवीर- 10, पन्हाळा- 15, राधानगरी- 42, शाहूवाडी- 89, शिरोळ- 5, नगरपरिषद क्षेत्र- 10, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-16 असे एकूण 274 आणि पुणे -1, कर्नाटक-२ आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील चौघे असे मिळून एकूण 278 रुग्णांची जिल्ह्यात संख्या आहे.

आपली प्रतिक्रिया द्या