कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्ह्यात आजही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी-जास्त राहिल्याने जिह्यातील सर्व लहान-मोठे धरण प्रकल्प 98 ते 100 टक्के भरले आहेत. पाटगाव वगळता सर्वच धरणांतून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीतही एक-दोन इंचांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास राधानगरी धरणाचा 6 व्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडून त्यामधून 1 हजार 428 आणि पॉवर हाऊसमधून 1 हजार 600 असा एकूण 3 हजार 28 क्युसेक पाणी विसर्ग सुरू होता. आज सायंकाळी उशिरापर्यंत हा स्वयंचलित दरवाजा उघडलेला होता.

जिह्यात यंदा दुसऱयांदा महापुराचे संकट टळले आहे. गेल्या आठवडाभरात पावसाचा जोर कमी राहिल्याने तब्बल 11 दिवसांनंतर पंचगंगेसह इतर नद्यांचे पाणी पुन्हा पात्रात स्थिरावले. गेल्या चार-पाच दिवसांत नद्यांच्या पाणीपातळीत घट होत आहे. आज दिवसभर जिह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होऊन पावसाची बुरबुर सुरू होती. धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह इतरही भागांत पावसाचा जोरही कमी दिसून आला. अजूनही 12 बंधारे पाण्याखाली आहेत. पंचगंगेची 18.9 फुटांवर असलेली पाणीपातळी सायंकाळी चारच्या सुमारास 19.2 फूट झाली होती.

धरण टक्केवारी विसर्ग

राधानगरी 99.42 3028

तुळशी 99.62 500

वारणा 95.53 1573

दूधगंगा 90.24 2718

कासारी 98.68 500

कडवी 100 845

कुंभी 97.92 300

पाटगाव 96.03 — चिकोत्रा 100 100

चित्री 99.62 180

जंगमहट्टी 100 99

घटप्रभा 99.73 900

जांबरे 100 146

आंबेओहोळ 88.23 15

मुळा धरणातून 4880 क्युसेकने विसर्ग

कोतुळकडून मुळा धरणात येणारी पाण्याची आवक मंगळवारी सकाळच्या तुलनेत सायंकाळी वाढली आहे. मंगळवारी सकाळी 3 हजार 517 क्युसेकने, तर सायंकाळी 6 वाजता 5 हजार 327 क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. धरणाचा सायंकाळचा पाणीसाठा 25 हजार 679 दशलक्ष घनफूट ठेवून मुळा नदीपात्रात 4 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर, मुळा उजव्या कालव्यातून 800 आणि डाव्या कालव्यातून 80 क्युसेकने विसर्ग सुरू होता.