
दिवाळी सणासाठी 13 ते 16 नोव्हेंबरपर्यंत महानगरपालिका व सर्व नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात ‘ग्रीन फायरक्रॅकर्स’ वाजवणे वा फोडण्यासाठी सायंकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत परवानगीचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले आहेत.
नवी दिल्ली येथील हरित लवादाच्या आदेशान्वये कोव्हीड-19 च्या पार्श्वभूमीवर शोभेची दारु (फटाका) विक्री व त्याच्या वापराबाबत आदेश दिलेले आहेत. त्यानुसार कोल्हापूरातही असे आदेश देण्यात आले. या आदेशाचे काटेकोरपणे पालन व तपासणीचे अधिकार पोलीस विभाग व संबंधीत महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. तसेच आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर भारतीय दंड संहीता 1860 (45) च्या कलम 188,आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.






























































