सामना ऑनलाईन । कोल्हापूर
कोल्हापूराच्या नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात दक्षिण द्वार सोहळा उत्साहात संपन्न झाला.
कृष्णा आणि पंचगंगा नदीचे पाणी दत्त मंदिरात शिरल्यानं आज शुक्रवारी संध्याकाळी पावणे आठच्या सुमारास दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला. यावेळी श्री दत्त महाराजांची मूर्ती नारायणस्वामींच्या मठामध्ये दर्शनासाठी ठेवण्यात आली होती, दक्षिणद्वार सोहळ्यासाठी भाविकांनी दर्शन आणि स्नान करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीचा संगम असणारे नृसिंहवाडी येथे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात कृष्णा – पंचगंगेचं पाणी दक्षिणद्वारातून येऊन पादुकांना स्पर्श करून उत्तरद्वाराने बाहेर पडल्यास दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला असे मानले जाते. या पाण्यामध्ये स्नान केल्याने पापमुक्ती होत असल्याची भाविकांची श्रध्दा आहे.

त्यामुळं मंदिरात पुराचे पाणी आल्याने भाविकांनी मोठ्या प्रमाणात स्नानाचा लाभ घेतला. यावेळी श्री दत्त देवस्थान आणि ग्रामपंचायतीकडून भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तयारी केली असुन खोल पाण्यात न जाण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.