मास्क,ग्लोव्हजशिवाय फिरणाऱ्यांना दणका, कोल्हापुरात एका दिवसांत 20 हजार 350 रुपयांचा दंडवसुली

664

कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आणि त्यांच्या पथकाने सोमवारी शहरात मास्क व ग्लोव्हजशिवाय फिरणाऱ्या नागरीक आणि व्यावसायिकांवर कारवाई केली. एकाच दिवसांत तब्बल 76 जणांविरोधात ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 20,350 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्हा हा ऑरेंज झोनमध्ये आहे, तो ग्रीन झोनमध्ये नेण्यासाठी पुढील 15 दिवस लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे. यासाठी नियम मोडणाऱ्यांविरोधात तसेच सरकारी बंधने न मानणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करा असे आदेशही त्यांनी दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या