कोल्हापूर – एका दिवसात विक्रमी 702 रूग्णांची वाढ, बाधितांचा आकडा 8 हजार पार

596

कोल्हापुरात गेल्या 24 तासात 702 नवे कोरोना पाॅझीटिव्ह रुग्ण आढळले. जिल्ह्यात इतक्या मोठ्या संख्येने प्रथमच एवढे रूग्ण आढळल्याने प्रशासकीय यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण बाधितांची संख्या 8 हजार 416 झाली आहे.

कोरोनामुक्त झालेल्या 162 जणांना दिवसभरात घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत एकूण 3 हजार 611 कोरोना- मुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शिवाय गेल्या चोवीस तासांत 12 जणांचा व आतापर्यंत 228 बाधीतांचा मृत्यू झाला असुन, सध्या एकूण 4 हजार 576 पॉझीटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडुन मिळाली.

आज आढळलेल्या 702 पॉझीटिव्ह अहवालांमध्ये कोल्हापूर शहर 188, इंचलकरंजीसह इतर नगरपरिषद क्षेत्रात 140, हातकणंगले-70, करवीर-61, राधानगरी- 47, शाहुवाडी-46, शिरोळ- 45, भुदरगड-35, आजरा-16, चंदगड, गगनबावडा आणि पन्हाळा प्रत्येकी 12 असे नवे कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळुन आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या