कोल्हापुरमध्ये झोपडपट्टी भागात मोबाईल व्हॅनद्वारे वैद्यकीय तपासणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणू कोवीड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यानुसार झोपडपट्टी भागात जाऊन मोबाईल व्हॅनद्वारे वैद्यकिय तपासणी करण्यात येत आहे.

आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी वैद्यकीय पथकाच्या टीम तयार करुन देण्याच्या सूचना आरोग्यधिकारी डॉ.दिलीप पाटील यांना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सोमवारपासून ही वैद्यकिय सेवा वारे वसाहत, यादवनगर,विक्रमनगर,सदरबझार  सोसायटी, कपूर वसाहत, गंजीमाळ, राजेंद्रनगर, मोरे-माने नगर, जोशी नगर या नऊ झोपडपट्टीत उपलब्ध करुन देण्यात आली. त्यामुळे झोपडपट्टीमधील नागरिकांची जागेवरच तापाची तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले.