
दिल्ली येथील मरकजमधुन शाहूवाडी तालुक्यातील उचत या मुळ गावी परतलेल्या ‘त्या’ करोनाबाधीत तबलिगी तरुणाच्या संपर्कात येऊन आणखी एकजण कोरोना बाधीत झाल्याचे स्पष्ट झाले. दोन दिवसांपूर्वी त्या तरुणाच्या कुटुंबातील एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असतानाच, आज पाॅझीटिव्ह आढळलेला हा 24 वर्षीय तरुण चुलत भाऊ आहे. तो रिक्षाचालक असल्याचे समोर आल्याने,आसपासच्या गावांसह परिसरातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
शाहूवाडीचे तहसिलदार गुरु बिराजदार यांनी पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या या रुग्णाबाबत माहिती दिल्यानंतर जिल्हाधिकारी देसाई यांनी, 17 ते 24 मार्च या कालवधीत पुणे, मुंबई येथून आलेल्या आणि शाहूवाडी, मलकापूर या गावात रिक्षा क्र.एमएच-09 -इएल- 1653 मधून प्रवास केलेल्या प्रवाशांनी कोणतीही प्राथमिक लक्षणे आढळल्यास तात्काळ स्वत:ची वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. तसेच ग्रामस्थांच्या वैद्यकीय तपासणीसाठी त्या-त्या गावामध्ये दवंडी देण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या.































































