
मुंबईचे भूमिपुत्र असलेल्या कोळी समाजाचे पारंपरिक मासेमारी करणाऱ्या जोडप्याचे शिल्प आणि ऐतिहासिक वरळी या नामफलकाचे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. वरळीची ऐतिहासिक ओळख जपणारे हे शिल्प आणि नामफलक सागरी सेतूवरूनही पाहता येणार आहे. वरळी सागरी कोळी महोत्सव समिती अध्यक्ष आणि युवासेना उपविभाग अधिकारी अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नांनी हे शिल्प आणि नामफलक उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर जे. के. कपूर चौक ते हर्डीकर मार्ग येथेही हेरिटेज लाईट लावण्यात आली आहे.
मुंबईचा विकास होत असताना भूमिपुत्र असलेल्या कोळी समाजाचे अस्तित्व झगमगाटीत कमी होत गेले. परप्रांतीयांचे आक्रमणही याला काही अंशी कारणीभूत ठरले. मात्र, तरीही आपल्या पारंपरिक मासेमारी व्यवसायाशी कोळी समाज एकनिष्ठ राहिला आणि आपली संस्कृती जोपासत राहिला. त्या पार्श्वभूमीवर वरळीची ऐतिहासिक ओळख सर्वांसमोर यावी यासाठी सागरी सेतूच्या बाजूस ऐतिहासिक वरळी नामफलक तसेच जे. के. कपूर चौक येथे कोळी शिल्पाचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी शिवसेना नेते- खासदार अरविंद सावंत, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, उपनेत्या किशोरी पेडणेकर, विधानसभा संघटक निरंजन नलावडे, उपविभागप्रमुख हरीश वरळीकर, राम साळगावकर, विधानसभा संघटक अनुपमा परब, सहविधानसभा संघटक मधुबेन पटेल, माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर, शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी, गोपाळ खाडे, रामकृष्ण शिंदे, राजेश दुबे, शाखा समन्वयक रुणाल लाड, संतोष जाधव, शाखा संघटक संगीता जगताप, भारतीय कामगार सेना संयुक्त सरचिटणीस संजय कदम, सहचिटणीस निशिकांत शिंदे, युवती विभाग अधिकारी आकर्षिका पाटील, शाखा अधिकारी संकेत वरळीकर, समन्वयक सचिन साळवे, सोशल मीडिया मुंबई समन्वयक शैलेश सिंह, सामाजिक कार्यकर्ते बाळाशेठ खोपडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.