
कोकण मराठी साहित्य परिषदेचा ३५ वा वर्धापनदिन दि.२४ मार्च रोजी मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात साजरा होणार आहे.
२४ मार्च रोजी सकाळी १०:०० वाजता वर्धापन दिनाच्या उद्घाटन सोहळा पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. यावेळी कोमसापच्या जेष्ठ सभासदांचा सन्मान सोहळा, पुस्तक प्रकाशन, परिसंवाद, कोकण मराठी साहित्य परिषदेचा आजवरचा प्रवास यासंदर्भात चर्चासत्र व निमंत्रितांचे कवी संमेलन संपन्न होणार आहे. प्रसिद्ध जेष्ठ कवी अशोक बागवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या निमंत्रितांच्या कवी संमेलनामध्ये कवी एल बी पाटील, कवी अरुण मोर्ये, कवी राष्ट्रपाल सावंत, कवी रूजारियो पिंटो हे कवी सहभागी होणार आहेत.


























































