आरवली ते वाकेड कामात दिरंगाई करणा-या ठेकदार कंपनीवर कारवाईची मागणी

384

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे आरवली ते कांटे व कांटे ते वाकेड या दोन टप्प्यातील पहिला टप्पा आरवली ते कांटे कि.मी 241 ते 281 या 40 कि.मी तर कि.मी 281 ते 332 या दोन टप्प्यात निविदा काढण्यात आल्या आहेत. दोन्ही टप्प्यातील कामे 23 जून 2016 रोजी मुंबईतील कंपनीला देण्यात आली . सदरच्या कंपनीने विहीत मुदतीत म्हणजेच 12 मार्च 2020 रोजी 730 दिवसांत महामार्ग चौपदरीकरण कामे पूर्ण करावयाची आहेत. मात्र कंपनीने विहीत मुदतीत कामे पूर्ण केली नसल्याने स्थानिक जनतेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे .

जनतेला आणि वाहनचालकांना होणारा मनस्ताप लक्षात घेऊन या कंपनीवर दंडात्मक स्वरुपाची कारवाई करुन कंपनीची बिले तातडीने थांबविण्या संदर्भात संतोष येडगे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता विनय देशपांडे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यानंतर कारवाई साठी त्यांना निवेदन दिले. कंपनीच्या जनविरोधी भुमिकेला कोकणातील जनता कंटाळली असून उर्वरित महामार्गाचे काम प्रगतीपथावर असताना फक्त 90 कि.मी मधील काम रखडल्याने आपण न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असून कंपनीच्या कामाची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली .

मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरण काम करणाऱ्या एम.ई.पी  या कंपनीने 28 जून 2016 ते 7 नोव्हेंबर 2019 पर्यंत आरवली ते कांटे 4 टक्के तर कांटे ते वाकेड 10;50 टक्केच काम केले आहे . राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून कामात प्रगती करण्याची तीन महिन्यांसाठी वाढीव संधी देण्यात आल्याचे  सांगण्यात आले मात्र दिलेल्या संधीतून कंपनीने आपल्या कामात प्रगती नाही . जनतेला आणि पर्यायाने राष्ट्रीय महामार्ग विभागाला वेठीस धरुन नव्हे तर न जुमानता सदरची ठेकेदार कंपनी एकाधिकारशाही गाजवत असल्याचे दिसून आले आहे अशा बेजबाबदार कंपनीला काळ्या यादीत टाकून हाती असलेल्या प्रकल्पाच्या कामांसंदर्भात कडक कारवाई करावी अशी प्रामुख्याची मागणी असल्याचा मुद्दा या दिलेल्या निवेदनात मांडण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या