कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त अरूण नेरूरकर यांचे निधन

कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त अरूण अच्युत नेरूरकर यांचे आज पहाटे 4 वाजता रत्नागिरीतील रहात्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी,जावई,सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

अरूण नेरूरकर यांचे साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात योगदान होते.रत्नागिरी नगर वाचनालयाच्या कार्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. 1990 ते 2003 पर्यंत ते रत्नागिरी नगर वाचनालयाचे संचालक होते. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेपासून संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्यासोबत संस्था वाढविण्यात महत्वाची भूमिका त्यांनी बजावली. कोकण मराठी साहित्य परिषदेचे ते विश्वस्त होते.

मागील अनेक वर्षे रत्नागिरीच्या साहित्य क्षेत्रात आणि इतर क्षेत्रात कार्यरत राहून अरुण नेरुरकर यांनी सांस्कृतिक वाटचालीत मोलाचे योगदान दिले आहे. रत्नागिरी नगर वाचनालयाच्या कार्यातही त्यांनी मोलाचा वाटा उचलला होता. रत्नागिरी नगर वाचनालयाच्यावतीने झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजनात त्यांचा मोलाचा वाटा होता.