चाकूचा धाक दाखवत मंगळसूत्र चोरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरात घुसून चाकूचा धाक दाखवत अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून पोबारा केला. हि घटना रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे गावात धामिलेवाडीत घडली.

कोतवडे धामिलेवाडीतील प्रतिभा परशुराम शिवलकर (68) यांचे दीर रात्री आठ वाजता लघुशंकेसाठी घरातून बाहेर गेले. त्यावेळी घराचा दरवाजा उघडा राहिला. तिच संधी साधून दोन अज्ञात चोरटे घरात शिरले. ओरडू नका असे सांगून प्रतिभा शिवलकर यांच्या पतीला चाकूचा धाक दाखवला. प्रतिभा शिवलकर सोडविण्यासाठी पुढे गेलेल्या असताना चोरट्यांनी त्यांना माजघरात ढकलत नेत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून पोबारा केला.