
कोपरगाव येथे एक लव्हजिहादचे एक प्रकरण समोर आले आहे. एका तरुणाने 20 वर्षीय हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडीओ बनवून तिला ब्लॅकमेल केले. त्यानंतर तिला धर्मांतर करण्यासाठी भाग पाडले. पिडीतेने थेट पोलीस स्थानकात धाव घेतली. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी एका मौलवीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करून घेतला आहे.
कोपरगाव येथील इंदिरापथ भागातील 20 वर्षीय तरूणीस प्रेमाच्या जाळयात ओढून तिची फसवणुक केली तिला व तिच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी देवून तीला बळजबरीने खडकी येथील मदरशात नेऊन आरोपीने बलात्कार केला तिच्या मर्जीविरोधात शरीरसंबंध करुन तिचे फोटो व व्हिडिओ तयार करण्यात आले व त्या आघारे त्या तरूणीस ब्लॅकमेल करुन इंदूर येथे बोलावून तिच्यावर बलात्कार केला आणि बळजबरीने धर्मांतर करुन तिच्याकडून नमाज पठण करण्यास भाग पाडले. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन सायम कुरेशी रा.जुना पिठा इंदूर मध्यप्रदेश, इमरान अयुब शेख रा.कोपरगांव, छोटू उर्फ कलिम (पूर्ण नांव माहित नाही) फय्याज (पूर्ण नांव माहित नाही दोघे रा.कोपरगांव व इंदूर येथील मौलवी पूर्ण नांव माहिती नाही अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयातील दोन आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके रवाना झाली असल्याची माहिती तपासी अधिकारी पोसई भरत दाते यांनी दिली.
























































